पथदर्शी प्रकल्प राबवण्याची नूतन पदाधिकार्यांची ग्वाही : पदग्रहण समारंभ उत्साहात
भुसावळ- रोटरी क्लब ऑफ भुसावळचा पदग्रहण समारंभ चक्रधर नगरातील डॉ. दावलभक्त सभागृहात संप झाला. या समारंभात मावळते अध्यक्ष डॉ.गिरीष कुळकर्णी व सचिव गजानन ठाकूर यांनी 2018-19 ची सूत्रे अध्यक्ष प्रदीप दवे तर सचिव रूपेश जैन यांच्याकडे सोपवली. पदग्रहण समारंभाच्या अध्यक्षस्थानी रोटरी ड्रिस्टीक्टचे प्रांतपाल राजीव शर्मा होते. याप्रसंगी मावळते अध्यक्ष व सचिव यांनी वर्षभराच्या कार्याचा आढावा सादर केला तर नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रदीप दवे यांनी रोटरीच्या सेवा कार्याचा वसा समर्थपणे सांभाळून येणार्या वर्षभराच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प राबवण्याचा संकल्प केला. यामध्ये आरोग्य, शिक्षण व सामाजिक सदभावना या क्षैत्रात विविध प्रकल्प राबवण्यात येतील, असे सांगण्यात आले.
रोटरीने पथदर्शी काम करावे -राजीव शर्मा
समारंभाचे अध्यक्ष प्रांतपाल राजीव शर्मा यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळ गत सहा दशकांपासून चांगली सेवा करीत असल्याचा कौतुकाने उल्लेख केला तसेच रोटरीच्या आंतरराष्ट्रीय सेवा कार्याची जाण ठेवत भुसावळ रोटरीने पथदर्शी काम करावे यासाठी प्रांतपाल म्हणून माझे सर्व प्रकारचे सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. समारंभाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.रवींद्र शुक्ला यांनी व्यक्त केले.
अशी आहे रोटरीची नुतन कार्यकारणी
अध्यक्ष प्रदीप दवे, सचिव रूपेश जैन, प्रेसिडेंट रवींद्र शुक्ला, उपाध्यक्ष गजानन ठाकूर, माजी अध्यक्ष डॉ.गिरीष कुळकर्णी, सेवाध्यक्ष विकास काव्यायनी, दीपक अग्रवाल, राजेश जोशी, सतीश महाजन तर विविध समित्यांच्या संचालकपदी अरूण मांडाळकर, नारायण आर्वीकर, सारंग चौधरी, अशोक काबरा, राजेश अग्रवाल, महेश भराडे, सतीष अग्रवाल, डॉ.मीनाक्षी वायकोळे, आशिष अग्रवाल, दिलीप खंडेलवाल व सल्लागार म्हणून पांडुरंग राव, हेमंत नाईक, राजेश अग्रवाल यांचा नूतन कार्यकारणीत समावेश करण्यात आला.