जळगाव । रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचा नागपूर येथे झालेल्या ‘स्वप्न सिध्दी’ पारितोषिक वितरण सोहळ्यात 10 अवॉर्डने गौरव करण्यात आला. झोन नऊ मधून बेस्ट प्रेसिडेंट म्हणून योगेश भोळे व बेस्ट सेक्रेटरी म्हणून संजय इंगळे मानकरी ठरले. रोटरी वेस्टला बेस्ट प्रेसिडेंट, सेक्रेटरी ऍवार्डसह मोफत कृतिम हात वितरण प्रकल्पास बेस्ट प्रोजेक्ट, मुक-बधीर वर-वधुच्या ‘मंगल विवाह’ सोहळ्यास बेस्ट अनयुझवल प्रोजेक्ट, पोलिओ कार्याबद्दल सर्टिफिकेट, डिस्ट्रिक्ट इव्हेंट ‘रोटो स्पोर्टस’च्या यशस्वी आयोजन आदिबाबत पुरस्कारांनी गौरविले गेले.
यांचा होता सहभाग
सहप्रांतपाल डॉ.राजेश पाटील यांना सहप्रांतपाल पदाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच रोटो स्पोर्टस व मंगल विवाहसोहळ्याचे प्रकल्पप्रमुख केलेल्या यशस्वी कार्याबद्दल दोन ट्रॉफी व अवॉर्ड देऊन विशेष सन्मानीत करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यास रोटरी वेस्टचे अध्यक्ष योगेश भोळे, डॉ.राजेश पाटील, अॅड.सुरज चौधरी, तुषार चित्ते, कृष्णकुमार वाणी, सागर पाटील आदि उपस्थित होते. अध्यक्ष योगेश भोळे यांच्या नेतृत्वात रोटरी वेस्टने रोटरीच्या पाचही उद्दिष्टानुसार शंभर टक्के कार्य केल्याबद्दल ‘रोटरी सर्व्हिस व्हील’ या सर्वात प्रतिष्ठेच्या पुरस्कार व प्रशस्तीपत्राने विशेष गौरव करण्यात आला. 125 क्लब मधून रोटरी वेस्ट या एकमेव क्लबची प्रांतपाल महेश मोकलकर व पुरस्कार समितीने निवड केली.