जळगाव । रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या नाशिक ते नागपुर कार्यक्षेत्रातील 125 क्लब मधून रोटरी वेस्टच्या अध्यक्षपदी निवड झालेले अॅड.सुरज जहांगीर यांनी वयाच्या 31व्या वर्षी सर्वात युवा रोटरी अध्यक्ष होण्याचा मान मिळविला आहे. तर मानद सचिवपदी कृष्णकुमार वाणी यांची निवड झाली आहे. रोटरी वर्ष 2017-18 साठी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टची अॅड.जहाँगीर यांनी नूतन कार्यकारिणी घोषित केली.
असे आहे कार्यकारी मंडळ..
आयपीपी योगेश भोळे, व्हाईस प्रेसिडेंट, किरण कक्कड, प्रेसिडेंट इलेक्ट संगीता पाटील, सहसचिव राजेश परदेशी, कोषाध्यक्ष अनुप आसावा, सार्जंट ऍट आर्मस सचिन मराठे, कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ.राजेश पाटील, विनोद बियाणी, अॅड.राहूल लाठी, निखील बियाणी, अरूप नंदर्षी, केकल पटेल, अनिल कांकरिया तसेच सल्लागार म्हणून डॉ.अरूण बगडिया, रमण जाजू, अनिल बोरोले, संदीप काबरा, गनी मेमन, नितीन रेदासनी, किरण राणे, अनंत भोळे, सुनिल अग्रवाल, चंद्रकांत सतरा यांचा समावेश आहे. यासह वीस विविध कमेटी चेअरमन यांच्या नावांची ही घोषणा करण्यात आली आहे. अॅड.जहाँगीर विधी क्षेत्रासह क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रीय असून वाणी हे संजय वॉचचे संचालक, व्यावसायिक आहेत.