रोटरी क्लब दीपनगरतर्फे पाट्यांचे वाटप

0

भुसावळ। औष्णिक विद्युत केंद्रातील अभिययंता, कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लबची स्थापना करण्यात आली. या क्लबतर्फे फेकरी गावातील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना पाट्या वाटप करण्यात आल्या. यासाठी युवा रोटरी सदस्य संदीप पारखे यानी पाट्या उपलब्ध करुन दिल्या. दीपनगर वसाहतीच्या जवळपास असणार्‍या सर्व शाळांमद्ये विविध उपक्रम रोटरीच्या माध्यमातून राबविण्यात आले. त्यात निंभोरा, कपिलवस्तु नगर, पिंप्रीसेकम, कंडारी येथील शाळेत देखील कार्यक्रम घेण्यात आला.
शिक्षकांनी उपक्रमाचे केले स्वागत
मुख्याध्यापिका सुनिता जोशी तर उर्दू माध्यमाच्या मुख्याध्यापिका शमिमबानो तडवी यांनी रोटरी सदस्यांचे स्वागत केले. तर अफरीन कौसर आणि फरिदाबानू शेख यांनी आभार मानले.
यांची होती उपस्थिती
यावेळी अध्यक्ष प्रविण बुटे, कोषाध्यक्ष मोहन सरदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व शिक्षणाचे महत्व पटवून दिले. सचिव आनंदगिर गोसावि यांनी उपक्रमांची माहिती दिली. सदस्य संदिप पारखे यांचे विशेष आभार मानले. या उपक्रमासाठी प्रकल्प संयोजक जे.पी.पाटील, एल.एन. भंगाळे यांनी परिश्रम घेतले. प्रमुख पाहुणे म्हणून अभियंता विजय बारंगे उपस्थित होते.