रोटरी क्लब शिंदखेडातर्फे नाटक कट्टा स्पर्धा संपन्न

0

शिंदखेडा:येथील रोटरी क्लब शिंदखेडा तर्फे ऑनलाइन एकपात्री व्हिडिओ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी कुठल्याही सामाजिक विषयावर भाष्य करणारे एकपात्री सादरीकरण असलेले दोन ते तीन मिनिटांचे व्हिडिओ मागविण्यात आले होते. या स्पर्धेत लहान गटात तन्वी सुषमा परेश(शिंदखेडा) हिच्या ‘लढेंगे जितेंगे’ या एकपात्री प्रयोगाला प्रथम क्रमांक तर सक्षम गिरासे(शिंदखेडा) याच्या ‘माणुसकीचे वाहक’ या प्रयोगाला द्वितीय क्रमांक मिळाला. मोठ्या गटात आदिती भावसार (टिटवाळा) हिच्या ‘जालियनवाला बाग हत्याकांड’ या प्रयोगाला प्रथम क्रमांक तर वैष्णवी भावसार (दिंडोरी) हिच्या ‘हिरकणी’ या प्रयोगास द्वितीय क्रमांक मिळाला.

स्पर्धेचे परीक्षण महेश मांजरेकर मुव्हीज या प्रोडक्शन हाऊसचे व्हिडिओ एडिटर प्रथमेश गिरासे यांनी केले. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना ‘मिसेस मुख्यमंत्री’ या लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते तेजस बर्वे, ‘तत्ताड’ या मराठी चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री मानसी पाठक आणि पुणे येथील ‘कल्लाकार फॅक्टरी’ या अॅक्टींग स्कूल चे संचालक पंकज सातव यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. या सर्व कलाकारांशी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मनमुराद गप्पा मारल्या आणि नाट्य व अभिनय क्षेत्रातील करिअर याबद्दल माहिती मिळवली.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉक डाऊन काळामध्ये सध्या घरी असलेल्या सर्वांना वेळेचा सदुपयोग करून आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळाली, म्हणून रोटरी क्लब शिंदखेडाच्या या अभिनव उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन संदीप सोनार, अध्यक्ष बाळकृष्ण बोरसे, सचिव विकी चंदनानी, विजय जाधव, स�