जळगाव। येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटी या क्लबचा पदग्रहण सोहळा मंगळवारी सायंकाळी हॉटेल रॉयल पॅलेस मध्ये उत्साहात संपन्न झाला. माजी प्रांतपाल दिपक शिकारपूर यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. नूतन अध्यक्ष अभिषेक अग्रवाल यांना प्रवेश मुंदडा यांनी तर मानद सचिव संजय दहाड यांना प्रखर मेहता यांनी कॉलर, पीन, चार्टर प्रदान करून पदभार सुपूर्द केला.
गोल्डसिटीचे नवे शिलेदार….
प्रेसिडेंट इलेक्ट प्रखर मेहता, सहसचिव विनायक बाल्दी, कोषाध्यक्ष जितू रावलानी, सार्जंट ऍट आर्मस महेश मल्हारा, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून जितेंद्र अग्रवाल, प्रशांत कोठारी, पंकज अग्रवाल, प्रवेश मुंदडा, धरम सांखला, चंदर तेजवानी, सुनील मिलवाणी, डॉ.सुर्यकिरण वाघण्णा, निलेश जैन, प्रिती मंडोरा, मिलन जैन, अमित आहुजा, नंदू आडवाणी, सुमीत छाजेर, ईशा मेहता यांचा समावेश आहे. सुनील आडवाणी, अमोल आसावा, पराग नाहाटा, यश रावलानी, योगेश आहुजा, विनोद जैन, आदित्य अग्रवाल, आनंद चोरडिया, जॅम्बो नाहार यांना रोटरीपीन प्रदान करण्यात आली. प्रखर मेहता यांनी सचिवांचा अहवाल तर प्रवेश मुंदडा व अभिषेक अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. सहप्रांतपाल वर्धमान भंडारी यांनी प्रांतपालांच्या संदेशाचे वाचन केले. परिचय ममता दहाड यांनी तर आभार सतिष मंडोरा यांनी मानले.