रोटरी प्राधिकरणतर्फे प्रेरणा

0

शाळेला ई लर्निंग संच भेट

वाल्हेकरवाडी : येथील प्रेरणा शिक्षण संस्था संचलित बबन रामा भोंडवे प्राथमिक विद्यालय, प्रेरणा माध्यमिक विद्यालयाला रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण यांच्यातर्फे ई लर्निंग संच भेट देण्यात आला. या संचाचे उद्घाटन रोटरी अध्यक्ष विलास गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सचिव अजय लंके, न्यू जनरेशन मिडियाच्या आदिती जोशी, नवीन वर्मा, प्रकल्प संचालक सुनील कुलकर्णी, मुख्याध्यापक के. डी. पवळे, एम. डी. पवार, एस. जे. शितोळे, जी. एस. दळवी, भावी अध्यक्षा वैजयंती आचार्य, किरण पवार, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. ई-लर्निंग संचाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मुलांना शिकण्यासाठी नवीन व आधुनिक साधन मिळाल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी आनंदी दिसत होते. शिक्षक व विद्यार्थी यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसत होते. अशा गरजवंत भागातील मुलांना शहरातील नागरिकांनीही मदत करावी, असे आवाहन रोटरीतर्फे करण्यात आले.

आधुनिक पध्दतीच्या शिक्षणाचे महत्व, आधुनिक पद्धतीने शिक्षण कसे घ्यायचे. त्याची ध्येय, उद्दिष्ट कोणती आहेत या बाबत माहिती देताना रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणतर्फे केल्या जाणार्‍या उपक्रमांची माहिती दिली. शिक्षकांना मोफत प्रशिक्षण देणे, ई-लर्निंग योजना, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, प्रौढ साक्षरता व आदर्श शाळा आदीं उपक्रम रोटरी क्लब राबवित आहे.
-विलास गावडे