जळगाव। येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन या क्लबचा पदग्रहण सोहळा झाला. डिस्ट्रीक गव्हर्नर इलेक्ट राजीव शर्मा यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
नूतन अध्यक्ष डॉ.अपर्णा मकासरे यांना श्रीकांत वाणी यांनी तर मानद सचिव उषा शर्मा यांना छाया पाटील यांनी कॉलर, पीन, चार्टर प्रदान केले. आय.पी.पी. श्रीकांत वाणी, उपाध्यक्ष छाया पाटील सहसचिव सुरेखा शिरूडे, कोषाध्यक्ष शेखर प्रभुदेसाई, सार्जंट ऍट आर्मस शैलेंद्र चिरमाडे, तर सदस्य डॉ.सुमन लोढा, दिलीप गांधी, डॉ.चंद्रकांत कोतकर, डॉ.के.सी.पाटील, डॉ.प्रकाश चित्ते, विनोद मल्हारा, डॉ.देविदास सरोदे, डॉ.अभिनय हरणखेडकर, सुनंदा लाठी, रमेशचंद्र जाजू आणि सल्लागार आनंद खांबेटे, प्रकाश चौबे, शंकरलाल पटेल, लिलाधर चौधरी, अनिल अग्रवाल, डॉ.रविंद्र महाजन यांचा समावेश आहे. महापौर नितीन लढ्ढा व डॉ.उल्हास पाटील यांना मानद सदस्य पीन प्रदान करण्यात आली.