रोटरी मिडटाऊनतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार

0

जळगाव । येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनतर्फे शनिवारी गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मु.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुळकर्णी, अध्यक्ष डॉ.अपर्णा मकासरे क्लब सल्लागार आनंद खांबेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्राचार्य डॉ.कुळकर्णी यांच्या हस्ते सारस किनगे, आर्यन महाजन, शर्वरी वाणी, अर्पित मकासरे, श्रिया वाणी, कशिश पाटील, सार्थक वाणी, चेतन पाटील, पायल पाटील या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.