रोटरी मिडटाऊन, सम्यकतर्फे मंगळवारी आरोग्य अभियान

0

जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन व सम्यक समाधान फाऊंडेशनतर्फे स्व. महेंद्र (राज) सुरवाडे यांच्या स्मरणार्थ मंगळवार दि.28 रोजी मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे सकाळी 8 ते 12 या वेळेत मोफत व अल्पदरात लिपीड प्रोफाईल व ईसीजी चाचण्या आरोग्य अभियानांतर्गत करण्यात येणार आहे.

दुपारी 5 ते 7 या वेळेत ‘हृदयविकार शोध, कारणे व उपचार’ याविषयी डॉ. सुनिल सुर्यवंशी हे मार्गदर्शन करणार असून आरोग्य विषयक प्रश्‍नांना उत्तरे देणार आहे. नावनोंदणीसाठी डॉ.सुरेंद्र सुरवाडे श्री हॉस्पीटल जळगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष किशोर सुर्यवंशी , डॉ. सुरेंद्र सुरवाडे, अभियान प्रमुख डॉ. विद्या सुरवाडे, सम्यक समाधान फाऊंडेशनचे ऍड. समाधान सुरवाडे, पॅथालॉजिस्ट डॉ.अमृता देशपांडे यांनी केले आहे