रोटरी रेलसिटीतर्फे भुसावळात घुमणार दांडियाचा आवाज

0

नवरात्रोत्सवानिमित्त आयोजन : उत्सवातील निधीतून मुसाळतांड्याचा होणार विकास

भुसावळ : समाजाचं देण लागतो या भूमिकेतून कार्य करणार्‍या रोटरी रेल सिटीतर्फे भुसावळात 27 ते 30 दरम्यान दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवातून जमा होणारा निधी तालुक्यातील मुसाळतांडा या गावाच्या विकासासाठी वापरला जाणार असल्याची माहिती रोटरी रेलसिटीचे चेअरमन आशिष पटेल, प्रोजेक्ट चेअरमन विकास पाचपांडे प्रोजेक्ट को चेअरमन संदीप सुरवाडे, उपाध्यक्ष महेंद्र मांडे यांनी पत्रकार परीषदेत दिली. बियाणी स्कूलच्या प्रांगणात 27 ते 30 दरम्यान दररोज सायंकाळी दांडियाचा आवाज घुमणार आहे.