रोटरी रेलसिटी तर्फे रविवारी पालकांची कार्यशाळा …

रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी तर्फे भुसावळ आणि परिसरातील पालकांसाठी दि 17 सप्टेंबर रविवार रोजी संपूर्ण एक दिवसीय कार्यशाळा प्रभाकर हॉल ,भुसावळ येथे आयोजित करण्यात आली आहे .या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी नागपूर हून सुप्रसिद्ध मनोवैज्ञानिक डॉ योगिता पांडे या येणार आहेत .या कार्यशाळेत मुलांचे पालन करताना येणाऱ्या अडचणी ,समस्या यांचेवर अतिशय सोप्या आणि सुलभ पद्धतीने कशी मात करावी हे प्रात्यक्षिका सह समजावण्यात येणार आहे .दिवस भाराच्या या कार्यशाळेत फक्त पालकांना प्रवेश आहे .त्यांच्या साठी सकाळपासून चहा ,नाश्ता ,जेवणाची पण सोय केलेली आहे .अतिशय नाममात्र शुल्कामध्ये ही कार्यशाळेसाठी नोंद करता येईल तरी जागरूक पालकांनी जरूर याचा लाभ घ्यावा असे आवाहन क्लब तर्फे करण्यात आले आहे .इच्छुकांनी डॉ समीर चौधरी7798801702 यांचेशी संपर्क करावा .