भुसावळ- रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे सालाबादाप्रमाणे यंदादेखील आदिवासी तांड्यावर दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आला. सर्व सदस्यांनी आपापल्या घरातील फराळ एकत्र करून भीलमळी व मुशाळतांडा येथील रहिवाशांना तब्बल 127 किलो फराळाचे वाटप केले. हा उपक्रम गत पाच वर्षांपासून सुरू असून तांड्यावरील सर्व महिला व बालगोपाल यांना अतीव आनंद झाला. यशस्वितेसाठी अध्यक्ष सोनू मांडे, सेक्रेटरी डॉ.मकरंद चांदवडकर, प्रोजेक्ट चेअरमन सागर वाघोदे तथा रोटरी क्लब सदस्य चेतन पाटील, विनायक फालक, मनोज सोनार, पंकज भंगाळे, महेश चौधरी, उमेश घुले, संदीप जोशी, पंकज भंगाळे आदींनी परीश्रम घेतले.