भुसावळ- रोटरी क्लब ऑफ, भुसावळ रेल सिटी व स्मार्ट स्किल्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, 28 रोजी सायंकाळी पाच वाजता शहरातील प्रभाकर हॉलमध्ये मोफत करीअरपर मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. यात नाशिक येथील अमित राठी हे विद्यार्थी व पालकांना डीएमआयटी विश्लेषण (भविष्यातील कल चाचणी) या बाबत मोफत मार्गदर्शन करतील. हे विश्लेषण सिंगापूर येथील कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थ्यांचे बोटाचे ठसे व बुब्बुळ यांचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून विद्यार्थ्यांना योग्य करीअर कोणते असेल याचा अहवाल मिळणार आहे. भुसावळ येथे अशा प्रकारचे शास्त्रोक्त विश्लेषण प्रथमच होत असून सवलतीच्या दरात अहवाल मिळणार आहे. या संधीचा परीसरातील पालक व विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी अध्यक्ष सोनू (महेंद्र) मांडे, सचिव डॉ.मकरंद चांदवडकर व प्रकल्प प्रमुख चेतन पाटील यांनी केले आहे.