रोटरी रेल सिटीतर्फे देव स्मृती गणेशोत्सव स्पर्धा

0

भुसावळ- रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही स्व.रोटेरीयन प्रसन्न देव स्मृती गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधीलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट मातीची मूर्ती असणार्‍या मंडळास तसेच उत्कृष्ट सामाजिक संदेश पोहोचवणार्‍या मंडळास अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांकाची पारीतोषिके देण्यात येणार आहे शिवाय उत्कृष्ट आरास साकारणार्‍या मंडळास विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. रेल सिटीचे परीक्षक लवकरच मंडळांना भेटी देऊन परीक्षण करणार आहेत. जास्तीत जास्त मंडळांनी यासाठी तयारी करावी, असे आवाहन क्लबचे अध्यक्ष सोनू मांडे, सचिव डॉ. मकरंद चांदवडकर, प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी यांनी केले आहे.