रोटरी रेल सिटीतर्फे ‘भुसावळ प्राईड’ पुरस्काराचे वितरण

0

प्रसिध्दीपासून दूर असणार्‍या चार सेवाव्रतींचा सत्कार

भुसावळ- रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे भुसावळ येथील निस्वार्थ व प्रसिध्दीपासून दूर राहून समाजकार्य करणार्‍या चार सेवाव्रतींना ‘भुसावळ प्राईड पुरस्कार’ देवून गौरवण्यात आले. सहकार नगरातील आयएमए हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात डॅनियल तलौरे (राजू अंकल) शेख मन्सूर शेख नासीर (कुर्‍हेपानाचे), सुमित चोरडिया (बिल्डर) तसेच दिलीप वामन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट प्रांतपाल राजीव शर्मा, उपप्रांतपाल किरण राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात भुसावळ तालुक्यातील नऊ शाळांना प्रथमोपचार पेटी क्लबतर्फे देण्यात आली. यात शिंदी, जाडगाव, जोगलखेडा, गौजोरा, सुनसगाव, महादेवमाळ, साकरी, भिलमळी, टहाकळी, टहाकळी या गावातील जि.प.शाळांना प्रथमोचार पेटी देण्यात आली. प्रसंगी रेलसिटी अध्यक्ष महेंद्र (सोनू) मांडे, सचिव डॉ.मकरंद चांदवडकर यांचा रोटरीमधील प्रतिष्ठित ‘पॉल ह्यरीस फेलो’ ही पदवी देवून सन्मान करण्यात आला. यशस्वीतेसाठी अध्यक्ष महेंद्र (सोनू) मांडे, सचिव डॉ.मकरंद चांदवडकर, प्रोजेक्ट चेअरमन संदीप सुरवाडे व सर्व रोटेरियन बंधूंनी परीश्रम घेतले.