रोटरी रेल सिटीतर्फे भुसावळच्या लडाख वीर डॉक्टरांचा सत्कार

0

भुसावळ- रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे लडाख येथे अपघातग्रस्त जवानांवर शर्थीचे उपचार करणार्‍या भुसावळ येथील डॉ.विरेंद्र झांबरे व डॉ.निलेश चौधरी यांचा रोटरीतर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सोनू मांडे होते. प्रास्ताविक सचिव डॉ.मकरंद चांदवडकर यांनी केले. डॉ.विरेंद्र झांबरे यांनी लडाख येथील प्रतिकूल परिस्थितीत अपघातग्रस्त जवानांची मदत करताना आलेला अनुभव कथन केला तर डॉ.निलेश चौधरी यांनी सांगितले की, आपणास प्रत्येकास किमान कृत्रिम श्वासोश्‍वास कसा द्यावा याचे ज्ञान हवे जेणेकरून अशा आपत्तीजनक स्थितीत त्याचा वापर करता येईल. अध्यक्षीय भाषणात सोनू मांडे यांनी आपल्या मुलांचे संगोपन योग्य प्रकारे करणे कसे आवश्यक आहे याबाबत माहिती दिली. आभार प्रदर्शन श्रीकांत जोशी यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन नितीन धांडे, मनीष पाचपांडे, देवा वाणी यांनी परीश्रम घेतले. याप्रसंगी रोटरी रेल सिटी चे सदस्य आपल्या परीवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.