रोटरी वेस्टचे कुलगुरु, जिल्हाधिकार्‍यांना मानद सदस्यत्व

0
22 नुतन सदस्यांचा स्वागत सोहळा
जळगाव- येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट क्लबमध्ये नुतन 22 सदस्यांचा स्वागत सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना रोटरीचे मानद सदस्यत्व प्रदान करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून माजी प्रांतपाल महेश मोकलकर, अध्यक्षा संगीता पाटील, मानद सचिव राजेश परदेशी, मेम्बरशीप डेव्हलपमेंट कमेटी चेअरमन विनोद बियाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरु पाटील व जिल्हाधिकारी निंबाळकर यांना महेश मोकलकर यांच्या हस्ते रोटरी पीन प्रदान करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी मानवतेच्या सेवेसाठी रोटरी कटीबद्ध असून पोलीओ निमूर्लन, व्यसनमुक्तीसह सामाजिक क्षेत्रात रोटरीने मोठे योगदान दिले आहे. भाषा, प्रांत, जात, धर्म, रंग यांचे भेद न पाळता रोटरी वेस्टने समाजाचे देणे लागतो. ही भावना वाढीस लावत ‘‘मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलतांना त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपतांना’’ या ध्येयाने कार्य करीत ठसा उमटवलेला आहे असे प्रतिपादन केले.
113 वर्षापासून रोटरी नावाच वादळ जगभरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे. रोटरी वेस्टच्या परिवारात 22 सदस्यांच स्वागत ही आनंदाची घटना असून नव्या सदस्यांची संवादाचा पूल यापूर्वीच्या सदस्यांनी तयार करावा असे माजी प्रांतपाल महेश मोकलकर यांनी सांगितले. तसेच केरळच्या पुरग्रस्तांसाठी रोटरीतर्फे शाळा बांधून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या सोहळ्यात शैलेश महाजन, गोपाल तायडे, दिपाली मेहता, शैलेंद्र चिरमाडे, संजय महाजन, हिमांशू पटेल, शिरीन चांडक, संदिप भोळे, डॉ. गिरीष नारखेडे, अनिता पाटील, प्रशांत महाशब्दे, शैलेजा पाटील, शुभांगी सुर्यवंशी, राहुल मोदियानी, रुपा शास्त्री, सरिता खाचणे, पार्थ मेहता, शैलेंद्र चव्हाण, देवेश कोठारी, मुनिरा तरवारी, रविंद्र अत्तरदे, मेहुल व्यास आदिंना सहकुटुंब मान्यवरांच्या हस्ते रोटरी पीन देऊन सदस्यत्व प्रदान करण्यात आले.
क्लबच्या ‘संवाद’ या प्रविण जाधव संपादित बुलेटीनचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक विनोद बियाणी यांनी केले. सुत्रसंचालन व परिचय सरिता खाचणे व विनित जोशी यांनी केले. माजी प्रांतपालांचा परिचय योगेश भोळे यांनी केला. स्वागत गीत निलीमा रेदासनी यांनी म्हटले. आभार माजी अध्यक्ष रमण जाजू यांनी मानले. यशस्वीतेसाठी रोटरी वेस्टचे सुनिल सुखवाणी, विवेक काबरा, महेश सोनी यांनी परिश्रम घेतले.