जळगाव । येथील रोटरी क्लब ऑफ जळगांव वेस्टच्या रौप्य महोत्सवी वर्षात नवीन 25 सदस्यांना नियोजीत प्रांतपाल राजीव शर्मा यांच्या हस्ते सदस्यत्वाची पीन व किट प्रदान करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात जगभरात रोटरी परिवारात नवीन सदस्यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात येतो. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे हा सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष ऍड. सुरज जहगीर, मानद सचिव कृष्णकुमार वाणी, मेंबरशीप स्टॅडिंग कमेटी चेअरमन विनोद बियाणी, क्लब ट्रेनर अनिल कांकरिया यांची उपस्थिती होती.
सदस्य कुटूंबीयांसह सन्मानीत
या सोहळ्यात डॉ. कल्पेश गांधी, मनीष सोनी, भद्रेश शहा, महेश सोनी, गौरव सफळे, कल्पेश पारेख, विश्वेश सुवर्णकार, समाकित मुथा, डॉ. मनोज पाटील, डॉ. भुषण सोमाणी, डॉ. वृषाली पाटील, निमिष शहा, डॉ. सुनील पाटील आदी नवीन सदस्यांना कुटूंबीयांसह सन्मानीत करण्यात आले.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
यावेळी बोलतांना राजीव शर्मा यांनी जगातील 202 देशांमध्ये असलेल्या रोटरी परिवाराचे सदस्य झाल्याबद्दल स्वागत करुन अहंकार सोडून रोटरी कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. फेलोशीप व फे्रंडशिप रोटरीचा पाया असून स्थानिक व्यक्तींच्या गरजा ओळखून सेवा प्रकल्प राबवावे तसेच सदस्यांमध्ये महिला सदस्यांचे प्रमाण पन्नास टक्के असावे असे सांगून रोटरी वेस्टच्या 25 वर्षापासून सुरु असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. परिचय अॅड राहूल लाठी यांनी तर सुत्रसंचालन काजल सुखवाणी यांनी केले.