जळगाव: सुप्रीम कॉलनीतील शारदा विद्यालयामधील विद्यार्थीनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने आयोजित केले होते. याप्रसंगी अध्यक्षा संगीता पाटील, मानद सचिव राजेश परदेशी, साक्षरता समिती प्रमुख सी.ए.स्मिता बंदुकवाला, रोटरी सदस्य सागर पाटील, केकल पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस प्रशिक्षक व कराटे तज्ञ विनोद अहिरे यांनी मुलींना स्व-संरक्षणासाठी मार्गदर्शन करुन काही सूचना व युक्त्या सांगितल्या. शेकडो विद्यार्थीनींनी या प्रशिक्षणाचा फायदा घेतला. यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.