रोटरी सुरक्षित बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

लॉकडाऊन पर्यंत सुरू राहणार

जळगाव : येथील महाबळ रोडवरील मायादेवी नगरातील रोटरी वेस्टच्या सुरक्षित बाजाराला पहिल्याच दिवशी 500 व्यक्तींनी खरेदी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लॉकडाऊनपर्यंत हा बाजार सुरू राहणार असून शहरात इतर ठिकाणीही रोटरी व काही संस्थांच्या मदतीने आणखी बाजार सुरू करण्यात येणार आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी योग्य पर्याय म्हणून काळाची गरज ओळखून रोटरी वेस्टने सुरक्षित वातावरणात ना नफा ना तोटा तत्वावर शेतकर्‍यांचा माल उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

न्यायधीशांपासून सामान्य नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मास्कला प्रचंड मागणी असून महिला बचत गटांमार्फत ते उपलब्ध करून दिले आहे. रोटरी सुरक्षित बाजारात प्रवेश केल्यानंतर प्रत्येक नागरिकांचा थर्मल चेकींग, हात धुण्याची व्यवस्था, सामान घेतल्यानंतर सावली असलेल्या प्रतिक्षालयात स्वतंत्र खूर्चीवर बसण्याची व्यवस्था, सॅनिटायझर केल्यानंतर टोकन पुकारा करून सोशल डिस्टेसिंग ठेवून खरेदी करता येते, भाजीपाला, फळे, दर यांची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहे.

यशस्वीतेसाठी रोटरी वेस्टेचे डॉ.राजेश पाटील, महेश सोनी, डॉ.सुशीलकुमार राणे,सुनील सुखवाणी, अरून नंदर्षी, महेश सोनी, सरिता खाचणे यांच्यासह 55 ते 60 सदस्यांनी परिश्रम घेतले.