भडगाव (प्रतिनिधी)
दि.१९/९/२०२३ रोजी घुसर्डी येथील शेतकऱ्याचा रोटाव्हेटर चोरी झाल्याच्या तक्रारीवरुन भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे भडगांव तालुक्यातील निंभोरा येथील संशईत प्रदिप गोपाल पाटील यास पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याचेकडेस रोटाव्हेटर बाबत चौकशी केली असता त्याचे साथीदार महेश छोटु पाटील रा. निंभोरा, शुभम ऊर्फ गणेश राजेंद्र महाजन, रा. कजगांव, चेतन साहेबराव शितोळे रा. भोरटेक ता. भडगावं यांनी सदरचा रोटाव्हेटर चोरल्याचे तपासामध्ये निषन्न झाले. सदर ४ ही आरोपींना ताब्यात घेवुन त्यांना गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली असुन कोर्टाने आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सुमारे १ लाख १० हजार रुपये किंमतीचा रोटाव्हेटर पोलीसानी जप्त केला आहे.
मा. सहायक पोलीस अधीक्षक सो.चाळीसगाव उपविभाग श्री. अभयसिंह देशमुख, पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोना/नरेंद्र विसपुते, पोकों/सुनिल राजपुत, पोकों/प्रविण परदेशी, पोकों/संदीप सोनवणे यांनी सदरची कारवाई केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ/संजय पाटील हे करत आहेत.