रोटोमॅकची 11 बँक खाती सील

0

दुसर्‍या दिवशीही सीबीआयचा छापा

कानपूर : रोटोमॅक पेन कंपनीचे मालक विक्रम कोठारी यांच्या घरावर मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी सीबीआयने छापा टाकला. या छाप्यांतून सीबीआयच्या हाती बरेच काही लागले असून, कोठारीला कधीही अटक होऊ शकते. आयकर विभागाने कोठारीच्या कंपनीची 11 बँक खाती सील केले आहेत.

प्रकरण 3695 कोटींचे
सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे ईडीनेही कोठारीसह तिघांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. कोठारीने 7 बँकांचे 3695 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केलेली नाही. कोठारी, त्याची पत्नी साधना आणि मुलगा राहुल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. सुरुवातीला विक्रम कोठारीने बँकेचे 800 कोटी रुपये बुडवल्याची माहिती होती, आता हे प्रकरण 3695 कोटींचे असल्याचे उघड झाले आहे.

     बँकांचे कर्ज       (कोटीमध्ये)
बँक ऑफ बडोदा      456.53
बँक ऑफ इंडिया     754.77
बँक ऑफ महाराष्ट्र   49.82
अलाहाबाद बँक    330.68
ओरिएंटल बँक       97.47
इंडियन ओवरसीज   771.07
यूनियन बँक        458.95