सचिवपदी प्रतीक लक्ष्मण माने
तळेगाव दाभाडेः रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगांव सिटीच्या अध्यक्षपदी केशव बळीराम मोहोळ-पाटील यांची तर सचिव पदी तळेगांव येथील प्रतीक लक्ष्मण माने यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर, रोटरीचे पदाधिकारी अक्षय मोरे, रिषभ कारवा, रोटरी सिटीचे संस्थापक विलास काळोखे, शशीकांत हळदे, नितीन शहा, मनोज ढमाले, संतोष शेळके, दिलीप पारेख, संजय मेहता, सुरेश धोत्रे, हरिश्चंद्र गडसिंग, सुरेश दाभाडे, सुरेश शेंडे, बाळासाहेब रिकामे, भगवान शिंदे, नर्सिंग बजाज, रेश्मा फडतरे, शाईन शेख, शरयू देवळे, सविता करणकोट, नगरसेवक श्रीराम कुबेर, अनंता खैरे आदी उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या सन 2018-19 या वार्षिक संचालक मंडळामध्ये उपाध्यक्षपदी यशवंत दाभाडे, आय.पी.पी. प्रतीक मेहता, खजिनदार आकाश गाडेपाटील, समुदाय सेवा संचालक आकाश लांडे, व्यावसायिक विकास संचालक वैभव तनपुरे, क्लब सेवा संचाकल अवधूत साळुंखे, आंतरराष्ट्रीय सेवा संचालक डॉ. पलक छाजेड, सदस्य संचालक अक्षय भेगडे, जनसंपर्क अधिकारी अक्षता सोनकांबळे, सह. जनसंपर्क अधिकारी कविता जावळेकर, सार्जेंट अॅट आर्मस् अजिंक्य कसाबी, महिला प्रतिनिधी फैमीन शेख, आय.टी.ऑफिसर प्रणिता शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक श्रीराम कुबेर, तिकोना पेठचे पोलीस पाटील अनंता खैरे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. पलक छाजेड, प्रास्ताविक दीपक फल्ले तर आभार यशवंत दाभाडे यांनी मानले.