रोडरोमिओंमुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये भीतीचे वातावरण

0

निगडी परिसरामध्ये महापालिका शाळा, महाविद्यालय परिसरात मुलींना रोडरोमिओंचा त्रास
मुलींना शाळा, महाविद्यालयात जायची भिती

निगडी : येथील महापालिका शाळा, महाविद्यालय परिसरात मुलींना त्रास देणार्‍या मुलांची संख्या वाढली आहे. येता-जाता शिट्ट्या मारणे, अश्‍लिल बोलणे आदी प्रकार वाढले आहेत. त्यामुळे परिसरातील मुलींना रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये काही वेळा वादावादीचे प्रसंग उद्भवतात. असे प्रकार रोखण्यासाठी निगडी, यामुनानगर, सेक्टर 22 येथील शाळा, महाविद्यालये तसेच रुग्णालय परिसरात महापालिकेच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बस विण्याचीमागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे रोडरोमिओंच्या त्रासाला आळा बसेल, असे नागरिकांना वाटते आहे. मुलींना शाळेत, महाविद्यालयात जाण्याची भिती वाटते आहे.

रोडरोमिओंचा उच्छाद वाढला
शाळा व महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंचा उच्छाद वाढला आहे. शाळा भरताना व शाळा सुटताना या परिसरात रोडरोमिओ सतत फिरत असतात. दुचाकीचा हॉर्न जोरजोरात वाजविणे, शि÷ट्ट्या मारत घिर÷ट्या मारणे, मुलींना आवाज देणे असे प्रकार यांच्याकडून होत असतात. या रोडरोमिओंना परिसरातील नागरिकांनी हटकल्यास त्यांना दमदाटी होते. त्यामुळेच शाळा, महाविद्यालय परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी होते आहे. काही रोडरोमिओ भरधाव वेगाने गाड्या चालविताना त्यामुळे विद्यार्थिंनीना त्रास होत आहे. रोडिरोमिओंकडून कर्णकर्कश हॉर्न देखील वाजविला जातो. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

रुग्णालयातही कॅमेरांची गरज
तसेच सेक्टर 22 मधील महापालिकेच्या दवाखान्यात निगडी, यामुननागर, रुपीनगर आदी भागातून आपल्या नातेवाइकांसोबत रुग्ण तपासणीसाठी येत असतात. यामुळे या दवाखान्यात रोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रुग्णालयातही अनेकदा रुग्णांचे नातेवाईक व डॉक्टरांत वादावादीचे प्रसंग घडतात तसेच रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रोज मोठ्या रांगा असतात. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दवाखाण्यासमोर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी होत आहे. रुग्णालयात अनेकवेळा कामाशिवाय देखील नागरिक हिंडताना दिसून येतात.

खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तानाजी काळभोर म्हणाले की, शहरात शाळा महाविद्यालये, दवाखाना परिसरात रोडरोमिओंचा उच्छाद वाढला आहे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांना एकटीने प्रवास करणे, शाळेत जाणे या गोष्टी टाळून त्या घरी बसून रहातात. यामुळे या मुलींचे मोठे नुकसान होते आहे. म्हणूनच अशा रोडरोमिओंवर नजर ठेवण्यासाठी शाळा, महाविद्यालय व दवाखाण्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे.