नवी दिल्ली । पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोने पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घातली आहे. ही कमालीची कामगिरी त्याने मैदानात नाही तर मैदानाबाहेर केली आहे. रोनाल्डोने फुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा बॅलन डी ऑर हा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकवला. हा पुरस्कार त्याने पाचव्यांदा पटकवला आहे. हा पुरस्कार पटकावून त्याने लियोनेल मेस्सीची बरोबरी केली आहे. मेस्सीनेदेखील पाच वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. रोनाल्डोनला गुरुवारी पॅरिसमध्ये झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जगभरातील फुटबॉल तज्ज्ञ असलेल्या 173 पत्रकारांनी केलेल्या मतदानावरून हा पुरस्कार निवडला जातो. रोनाल्डोसोबत या पुरस्काराच्या शर्यतीत नेमार आणि मेस्सी यांचादेखील समावेश होता. त्यांना मागे टाकत तो पाचव्यांदा पुरस्काराचा मानकरी ठरला. दुसर्या स्थानावर लियोनेल मेस्सी तर तिसरे स्थान ब्राझिलच्या नेमार यानी पटकावले.
दुसर्यांदा ठरला मानकरी
हा पुरस्कार रोनाल्डोने सलग दुसर्यांना जिंकला आहे. 2008 मध्ये मॅनचेस्टर युनायटेडमध्ये त्याने या पुरस्काराला गवसणी घातली. त्यानंतर 2013, 2014 मध्ये त्याने हा किताब जिंकला 2016 मध्ये चौथ्यांदा तो या पुरस्काराचा मानकरी ठरला. याशिवाय रोनाल्डोने 2016-2017 मध्ये फीफा मेन्स प्लेयर ऑफ द इअर चा पुरस्कार देखील मिळवला होता. तर 2016 मध्ये फीफा क्लब वर्ल्ड गोल्डन बॉल ऑफ द इअर का अवॉर्ड वरही आपली मोहोर उमटवली. रोनाल्डोच्या नावावर एका आगळ्या विक्रमाची नोंद आहे. 2014 साली खेळलेल्या सामन्यांमध्ये रोनाल्डोने सामन्याच्या 90 मिनिटांच्या खेळातील प्रत्येक मिनिटाला गोल करण्याचा विक्रम केला होता. सामन्याचे शेवटचे 90 वे मिनिट हे रोनाल्डोसाठी खास आहे. या 90 व्या मिनिटांमध्ये रोनाल्डोने तब्बल 22 गोल नोंदवले आहेत.
रेआल माद्रिदला विजय
रोनाल्डोने तीन वर्षांत दोनदा आपल्या रेआल माद्रिद या क्लबला दोन वेळा चँपियन्स लीगचे विजेतेपद मिळवून दिले. मैदानातील चांगल्या कामगिरीच्या जोरावर 2008 मध्ये मँचेस्टर युनायटेड क्लबमधून इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेत खेळताना रोनाल्डोने पहिल्यांदा हा पुरस्कार पटकवला होता. त्या वेळी मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग आणि चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवले होते.