रोनाल्डोच्या माद्रिदने कोरले जेतेपदावर नाव

0

माद्रिद । रियल माद्रिदने मॅलागाला 2-0 असे नमवीत ला लिगा स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो व करीम बेन्झेमा यांच्या प्रत्येकी एक गोलच्या बळावर माद्रिदने हे यश मिळविले. विजयी होण्यासाठी माद्रिदला फक्त एका गुणाची गरज होती, ते वसूल करत विजेतेपदावर मोहर लावली. माद्रिदसाठी हे 33 वे लीग जेतेपद ठरले आहे. तब्बल पाच वर्षानंतर विजेतेपद मिळाल्याने हा क्षण अत्यंत अत्यंत आनंदाचा ठरला.

पोर्तुगालचा आक्रमक आघाडीवर रोनाल्डोने अवघ्या दुसर्‍याच मिनिटाला गोळा केला. त्यानंतर जवळपास पूर्ण सामन्यावर माद्रिदचे वर्चस्व राहिले. रोनाल्डोसाठी हंगामातील हा 40 वा गोल ठरला. बेन्झेमाने दुसर्‍या सत्रात 10 मिनिटांचा खेळ बाकी असताना संघाचा दुसरा गोल केला. या विजयासह माद्रिदने 93 गुणांवर झेप घेत जेतेपद निश्चित केले. या स्पर्धेत त्यांचा हा सलग सहावा विजय ठरला.

माद्रिदला एप्रिलमध्ये बार्सिलोनाविरुद्ध 3-2 फरकाने स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी विजयात सातत्य राखले आहे. गतवर्षातील जेत्या बार्सिलोना संघाने घरच्या भूमीत खेळताना ऐबरला 4-2 अशा मोठया फरकाने नमवले आणि 90 गुणांपर्यंत मजल मारली. स्पर्धेत ते दुसर्‍या स्थानी असतील, हे यावेळी निश्चित झाले. माद्रिदचे बॉस व माजी दिग्गज फुटबॉलपटू झिनेदिन झिदान यांनी आपल्या व्यावसायिक जीवनातील हा सर्वात आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली.