रोनाल्डो फिफाच्या उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित

0

झूरीच : ख्रिस्तीयानो रोनाल्डोला फिफा संघटनेतर्फे उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून फिफाचे अध्यक्ष जिआनी इन्फॅन्टीनो यांच्या हस्ते रोनाल्डोने पुरस्कार स्वीकारला. रोनाल्डोने बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा स्ट्राईकर लियोनल मेस्सी आणि एंटोनी ग्रीजमन यांना मागे टाकत या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. रोनाल्डोला एकूण ३४.५४ टक्के मते मिळाली. मेस्सीलला २६.४२ टक्के तर एंटोनीला ७.५३ टक्के मते मिळाली. रोनाल्डोची हवा ही जगप्रसिद्ध आहे. त्याने आपल्या कामगिरीने आणि आपल्या स्टाईलने आपला एक वेगळा दर्शकवर्ग तयार केला आहे.

चाहत्यांच्या उत्साहाला उधाण
पुरस्कार स्वीकारल्यानंतर रोनाल्डो म्हणाला, की २०१६ हे माझ्या कारकीर्दीतील सर्वोतम ठरले. मला माझ्या कामगिरीबद्दल अनेक शंका होत्या पण ही ट्राफी जिंकल्यानंतर माझ्या शंकाचे समाधान झाले आहे. चाहत्यांना माझ्याकडून असलेल्या अपेक्षांवर मी खरे उतरलो आहे. ज्यांनी मला मत दिले मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो, मी इतर खेळाडूंना व मीडियाला पण धन्यवाद देतो, असे तो म्हणाला. त्याला मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्या चाहत्यांच्या उत्साहाला देखील उधाण आले आहे. सोशल माध्यमांवर देखील त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.