रोबोट वॉर स्पर्धेत शाहू कॉलेज प्रथम

0

पिंपरी-चिंचवड : मुंबई येथील ‘आयआयटी’च्यावतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय टेकफेस्ट रोबोट वॉर या तांत्रिक स्पर्धेत ताथवडे येथील राजर्षी शाहू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मॅकेनिकल विभागातील गणेश जगताप, सर्वेश पाटील, रविराज इनामके, मनिष विश्‍वकर्मा यांचा विजेत्या संघात समावेश आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पनिशर या रोबोटने सहभागी झालेल्या 150 अधिक रोबोटवर मात करून प्रथम क्रमांक मिळवला.विजेत्या शाहू कॉलेज संघास 30 हजारांचे बक्षीस देण्यात आले. विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ अविनाश बडदे, प्रा. जालिंदर कुटे यांचे मार्गदर्शन लाभले.

या कामगिरीबद्दल जेएसपीएमचे संस्थापक सचिव आमदार प्रा तानाजी सावंत, ताथवडे कॅम्पसचे संचालक डॉ. पी. पी. विटकर, सह संचालक प्रा. सुधीर भिलारे, रवी सावंत, प्राचार्य डॉ. आर. के. जैन, उपप्राचार्य प्रा. अविनाश देवस्थळी यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.