पाचोरा : येथील ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनमार्फत घेण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेचे प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक वाल्मिक पाटील, पप्पु राजपूत, राजु पाटील, संस्थेचे संचालक गोकुळ सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय विद्यार्थ्यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक जाणीव समृद्ध होण्यासाठी ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणुन शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ज्ञान आणी विज्ञानाच्या प्रवाहातून मुलांची बुद्धीमत्ता अधिक विकसित व्हावी तसेच विविध प्रात्यक्षिके आणी प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनेला चालना मिळावी, अशा हेतुने रोबो ज्ञान ची रचना करण्यात आली आहे. रोबो ज्ञान कार्यशाळा सामान्यतः तीन तासांची असुन दोन भागांमध्ये विभागली जाते.
प्रथम भागात ऑडिओ, व्हिडिओ आणि एनिमेशनच्या सहाय्याने तंत्रज्ञानाच्या संकल्पना समजावण्यात येतात तसेच आता अस्तित्वात असलेले अत्याधुनिक रोबोट आणि त्याचे कार्य मुलांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात येते तर मुलांकडून प्रत्यक्ष कृतीतून इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि रोबटिक सेन्सर प्रणाली वर आधारित विविध प्रोजेक्ट करून घेतले जातात. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृष्णा बोरुडे यांनी केले तर प्रास्ताविक गोकुळ सोनार यांनी केले.