नवी दिल्ली । वर्ल्ड हॉकी लीगमधील सुमार कामगिरीनंतर भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांच्या कारकिर्दीत संघाने केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्याचा निर्णय हॉकी इंडियाने घेतला आहे. ओल्टमन्स यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी संघाचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर डेव्हिड जॉन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. हॉकी इंडियाच्या या निर्णयामुळे ओल्टमन्स अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आशियाई खंडातील देशांसोबत खेळताना भारतीय संघ उत्तम खेळ करतो.