रोलर स्केटींग स्पर्धेत एकलव्यच्या खेळाडूंची निवड

0

जळगाव । नाशिक येथे होणार्‍या हेमंत गोडसे सामाजिक प्रतिष्ठान नाशिक आयोजित पहिल्या इनडोअर खुल्या राष्ट्रीय रोलर स्केटींग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये एकलव्य क्रीडा संकुलाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. क्रीडा शिक्षक रणजीत पाटील व कु. रिना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी प्रा. श्रीकृष्ण बेलोरकर तसेच एकलव्य क्रीडा संकुलातील सर्व प्रशिक्षक प्रशिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले