चाळीसगाव : तालुक्यातील रोहिणी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गाळ काढण्याचे कामास मंजुरी मिळालेली होती. गाळ काढण्याचे कोणतेही काम केलेले नसतांना जॉब धारकांच्या नावे पैसे काढले आहेत. कोणतेही काम केलेले नसतांना पैसे काढले या कामाची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील रोहिणी येथील ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी चाळीसगाव यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गाळ काढण्याच्या 2 कामांना मंजुरी आहे मात्र तेथे कोणतेही गाळ काढण्याचे काम झालेले नाही जवळील व्यक्तीच्या नावे खातेदारांच्या नावावर 4 ते 6 मस्टर्ड काढण्यात आले आहे.
त्या ठिकाणी कोणतेही काम केलेले नसून रोजगारांना रोजगार मिळाला नाही. शासनाची फसवणूक करून सदर काम चालू आहे. या कामाची चौकशी करावी. चौकशी झाल्याशिवाय कुठलेही बील अदा करु नये व दोषींवर कारवाई करावी चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रति ग्रामविकास मंत्री , जिल्हाधिकारी जळगाव, तहसीलदार चाळीसगाव यांना पाठवण्यात आल्या आहेत. निवेदनावर बापूराव बोडरे, राजेंद्र वाघ, संदीप दिघोळे, विलास घुगे, भागवत नागरे, रवींद्र दिगोळे , सुदाम भोजने, संदीप बोडरे, यांच्या सह ग्रामस्थानच्या सह्या आहेत.