फैजपूर। वर्ग नगरपालिका क्षेत्रात मनरेगाची सुरू असलेली कामे आता राज्य रोजगार हमी योजनेद्वारे होतील. यासाठी त्या-त्या भागातील तहसीलदारांना कार्यक्रम अधिकारी म्हणून घोषीत केले आहे. याअनुषंगाने गुरुवारी फैजपूर पालिकेत झालेल्या बैठकीत जळगाव येथील रोहयोच्या अधिकार्यांनी पालिकेने गरजेच्या कामांचा सविस्तर आराखडा तयार करून तहसीलदारांकडे द्यावा, अशी सूचना केली.
15 ऑगस्टपर्यंत तहसिलदारांकडे करावा लागणार प्रस्ताव सादर
वर्ग नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेत सुरु असलेली कामे राज्य रोजगार हमी योजनेमध्ये वर्ग करून पुढे सुरु ठेवावी, असे शासनाचे निर्देश आहेत. या योजनेतून पालिकांना 20 लाख ते एक कोटी खर्चापर्यंतची नाले-गटारी सफाई, आरक्षित भुखंडांवर उद्यान, स्मशानभूमी, कब्रस्तान विकसित करणे ही कामे करता येतील. फैजपूर पालिकेला या योजनेंतर्गत कामे करायची असतील तर सविस्तर आराखडा तयार करून 15 ऑगस्टपर्यंत तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. तहसीलदार हा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठवतील. त्यास शासनाची मान्यता मिळताच कामे मार्गी लागतील. गुरुवारी फैजपूर पालिकेत झालेल्या बैठकीत योजनेंतर्गत होणार्या कामांची माहिती रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, अभियंता आर.एस.महाजन यांनी दिली.
यांची होती उपस्थिती
यावल तहसीलदार कुंदन हिरे, उपनराध्यक्ष हेमराज चौधरी, कनिष्ट अभियंता डिगंबर वाघ, नगरसेवक मिलिंद वाघुळदे, गटनेता शेख कुर्बान, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, रशिद तडवी , देवेंद्र साळी , मुख्याध्यापक मलक शरीफ, जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहायक कार्यक्रम अधिकारी जितेंद्र मोरे, तांत्रिक अधिकारी नेमचंद बर्हाटे आदी उपस्थित होते.