मोहाली : श्रीलंकेविरुद्ध दुसर्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने चौकार-षटकारांची आतषबाजी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सलामीला आलेल्या रोहितने श्रीलंकेची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. त्याने अवघ्या 153 चेंडूंमध्ये नाबाद 208 धावा कुटल्या. एकदिवसीय कारकिर्दीत तीन द्विशतके ठोकण्याचा पराक्रम त्याने केला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित हा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, रोहितचा बुधवारी लग्नाचा दुसरा वाढदिवस होता. याच दिवशी त्याने ही विक्रमी खेळी केली.