शिरपूर । केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना अंतर्गत आदिवासी बहुल रोहिणी गावात 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन नंदुरबार लोकसभेचे खासदार डॉ. हिना गावित यांच्याहस्ते करण्यात आले. यादुर्गम भागाच्या विकासासाठी तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी नवीन उपकेंद्र उभारण्यासाठी खा.डॉ हिना गावित यांच्याकडे नेहमी पाठपुरावा केला आहे. खा.डॉ.हिना गावित यांनी जनतेला आश्वासन दिले होते ते पूर्ण होत असतांना जनतेत जल्लोष पाहण्यात आला.
शिंगावे येथे समाजमंदिराचे भूमीपूजन
खासदार डॉ. हिना गावित यांच्याहस्ते खंबाळे येथे पंतप्रधान उज्वला योजना अंतर्गत महिलांना मोफत गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले तसेच रोहिणी ग्रामपंचायत नूतनीकरण शुभारंभ,बचत गटाच्या महिलांना शिलाई मशीन वाटप तसेच खासदार विकास निधी अंतर्गत शिंगावे येथे रु.10 लक्षाचे समाजमंदिराचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे डॉ जितेंद्र ठाकूर विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता श्री ठाकूर उपकार्यकारी अभियंता नेमाडे पंचायत समिती सदस्य रेहमान पावरा बालकिसन पावरा गोमतीबाई पावरा माजी जिप सदस्य वसंत पावरा माजी पंचायत समिती सभापती रतन पावरा नगरसेवक रोहित रंधे माजी पस सदस्य कन्हैयादादा पावरा रामदास कोळी उपाध्यक्ष मिलिंद पाटील चिटणीस चंद्रकांत पाटील तोंदे सरपंच महेश चौधरी डॉ आनद पावरा सुकदेव कोळी अशोक पाटील श्री परदेशी निलेश महाजन शेखर माळी गॅस एजन्सी चे कल्याण पाटील नरेंद्र मराठे आदी उपस्थित होते.रोहिणी परिसराचे कार्यक्रमाचे आयोजन सरपंच मनीषा पावरा व उपसरपंच बन्सीलाल बंजारा यांनी केले.