रोहिणी येथे तंबाखुमुक्त अभियानाची रॅलीव्दारे जनजागृती

0

शिरपूर । कै.अण्णासाहेब विज्ञान महिररार प्राथमिक शाळा रोहिणी येथे सलाम मुंबई फाउंडेशन व स्व. डी. आर राजपूत प्रतिष्ठान भावेर यांच्या संयुक्त विद्यमाने भटेसिंग राजपूत व योगेश पाटील याच्या मार्गदर्शनाने तंबाखू मुक्त अभियानाची भव्य रॅली काढण्यात आली.

रॅलीत डी. आर.के.माध्यमिक रोहिणी व मा.गांधी आश्रम शाळा रोहिणी, यांनी सुद्धा सहभाग घेतला. रॅलीत व तंबाखू मुक्तीचे संदेश असलेले बॅनरद्वारे जनजागृती करण्यात आली. ग्रामस्थांनाही रॅलीत सहभाग घेतला. यावेळी व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली भटेसिंग राजपूत, मनीष पाटील ,महिरे सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्या. मनोहर गव्हाणे, अकाराम पावरा, श्रद्धेश कुलकर्णी, जगदीश कोळी, शिवलाल जाधव ,भामरे मनोज सर ,रमेश गोपाळ व हर्षदा वानखेडे व विकास महिरराव यांनी केले.