शिरपूर । तालुक्यातील अतिबहूल आदिवासी रोहिणी भागात पारंपारिक यात्रोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राज्य शासनाच्या व केंद्रशासनाच्या विविध योजनांचे लाभार्थीना लाभ पत्रांचे वाटप भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्याहस्ते करण्यात आले. रोहिणी हा भाग शिरपूर तालुक्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी आता काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ भरत आहे. येथील आदिवासी बांधव व बंजारा बांधव आपल्या कौशल्यांनुसार शेती करून उदरनिर्वाह करीत आहे. या अतिबहूल दुर्गम भागाच्या जनतेकरिता राहुल रंधे युवा फॉऊनडेशनचे स्वयंमसेवक राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची माहिती या दुर्गम भागाच्या जनतेला कळवित असतात. सर्व योजनांचे अर्ज भरून तहसील स्तरावर पाठपुरावा करीत असतात.
यांची होती उपस्थिती
राहुल रंधे युवा फॉऊनडेशनचा मुळउद्देश शिरपूर तालुक्यातील गोर-गरीब निराधार, वृद्ध व्यक्ती. अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिला,अशा सर्व जनतेला मदत करण्याच्या मूळ हेतूने स्वयं-सेवक कार्य करीत आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोहिणी गावाचे उपसरपंच बन्सीलाल बंजारा, भाजपा युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष डॉ.मनोज महाजन, डॉ.आंनद पावरा, भोईटी सरपंच दिपक पावरा, उपसरपंच रविंद्र कोळी, रामदास कोळी, फत्तेसिंग बंजारा, शिवानंद बंजारा, रतीलाल पावरा, निर्मला भील खलालसिंग पावराख पूनमचंद पावरा, भोजू भील आदींची उपस्थिती होती.