हॅमिलटन: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामना आज बुधवारी सुरु आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून मजबूत सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या दमदार खेळीने 89 धावांची सलामी दिली. दरम्यान या सामन्यात विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडत अव्वल स्थान पटकावले. विराट कोहलीच्या 25 व्या धावावर नवीन विक्रम झाला. भारताकडून ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान कर्णधार म्हणून कोहलीने पटकावला. त्यानं महेंद्रसिंग धोनीला ( 1112) मागे टाकले. या विक्रमात दक्षिण आफ्रिकेचा फॅफ ड्यु प्लेसिस ( 1273) आणि केन विलियम्सन ( 1134) आघाडीवर आहेत.
पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने दमदार फटकेबाजी केली. ४० चेंडूत ६५ धावांची दमदार खेळी रोहितने केली. पॉवरप्लेमध्ये अर्धशतक झळकावणारा रोहित हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला.