कोलंबो । प्रशिक्शक नेमण्याच्या नाट्यमय घडामोडीनंतर श्रींलकेत गेलेला भारतीय संघ कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी पहिला सराव सामना खेळण्यासाठी शुक्रवारी मैदानात उतरेल. अध्यक्शीय संघाविरुद्धच्या या दोन दिवसीय सामन्यात दुखापतीतून सावरलेला रोहित शर्मा आणि राहुल लोकेश कशी कामगिरी करतात याकडे सगळ्यांचे लक्श असेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गाले येथे 26 जुलैपासून रंगणार आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत रंगणार्या या दौर्यात विराट कोहलीचा संघ मागील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक असेल.
या दौर्यातून चांगले निकाल आणण्याचे दडपण संघाचे नवीन प्रशिक्शक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीवर असेल. या दोन दिवसीय सराव सामन्यात दोन्ही संघ आपल्या चुका सुधारण्यावर भर देतील. दुखापतीतून बरे झाल्यावर मैदानात उतरणार्या रोहित शर्मा आणि लोकेश राहुल कसे खेळतात यावर भारतीय संघव्यवस्थापनाची रणनिती अवलंबून असेल दुखापतीमुळे रोहित इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत खेळु शकला नव्हता.शस्त्रक्रियेनंतर रोहितने खेळात चांगली प्रगती दाखवली आहे. यावर्षी आयपीएलमध्ये त्याने संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही रोहितने चांगल्या धावा केल्या आहेत. रोहितचा फिटनेस डोळ्यासमोर ठेवून निवड समितीने वेस्टइंडिज दौर्यासाठी त्याला विश्रांती दिली होती.