मुंबई । हैद्राबाद विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्यानंतर देशभरात वादंग निर्माण झाला. सरकारने चौकशीसाठी न्या. ए.के. रुपनवाल यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीने आपला रिपोर्ट सादर केला आहे.
यानुसार रोहित वेमुला हा दलित नव्हता आणि त्याने आत्महत्या ही वैयक्तिक कारणामुळे केली असल्याचे म्हटले आहे. छात्रभारती संघटनेने या चौकशी समितीच्या निरीक्षणांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. या चौकशी समितीने मूळ प्रश्नांना बगल देत अॅट्रॉसिटी कायद्यातून स्मृती इराणी, बंडारू दत्तात्रय आणि हैद्राबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव आणि अभाविप कार्यकर्ता सुशीलकुमार यांच्या सुटकेसाठीचे हे षडयंत्र आहे.