रोहित शर्मा म्हणतो संडे ‘फूल टू फॅमिली’!

0

मुंबई-क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंना परिवाराला वेळ देता येत नसल्याची ओरड असते. त्यामुळेच काही खेळाडूंनी दौऱ्यादरम्यान पत्नीला सोबत ठेवण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान आता भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने ट्वीटरवर एक फोटो शेअर केले असून, आजचा रविवार पूर्णत: कुटुंबियांसाठी असल्याचे म्हटले आहे.

सध्या भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु आहे. दोन कसोटी सामने खेळले गेले आहे. त्यात दोन्ही संघ बरोबरीत आहे.