रोहित शेट्टीने मराठीत अंदाजात दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

0

मुंबई : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये रणवीर सिंग आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत सिद्धार्थ जाधवसोबत रोहित शेट्टीने चक्क मराठी अंदाजात चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या आगामी ‘सिम्बा’ चित्रपटात सिद्धार्थ मुख्य भूमिकेत आहे,’ अशी गंमत रोहित करत असतानाच सिद्धार्थ म्हणतो, ‘नाही नाही, रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी हे दोघेच मुख्य आहेत.’

येत्या २८ डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.