माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची उपस्थिती
निगडी : येथील संत गुरू रविदास विचार समितीच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय संत गुरूरोहिदास पुरस्कार सोहळा कार्यक्रम आज (25 रोजी) होणार असल्याची माहिती समितीने अध्यक्ष संतोष वाघमारे व रमेश साळवे यांनी दिली. प्राधिकरणातील गणेश तलावा शेजारी संत रोहिदास मंदिर येथे सांयकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. संत रोहिदास महाराज यांच्या 641व्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी विविध क्षेत्रात उलेखनीय कार्य करत असलेल्यांना गौरविण्यात येते. खासदार श्रीरंग बारणे व पाली भाषेच अभ्यासक, प्राध्यापक व पिंपरी विधानसभेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांना विशेष सन्मान देऊन गौरवण्यात येणार आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, यांच्या हस्ते होणार्या या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
यावेळी युवामित्र किसन बावकर, पोलिस निरीक्षक विजया करांडे, उद्योजक रघुनाथ रोकडे, उद्योजक सोमनाथ पाचरणे, युवा उद्योजक रामचंद्र कबाडे, शासकीय सेवेसाठी विजय वाघमारे, गुणवंत कामगार नितीन आकोटकर, पोलिस उप आयुक्त सुरेश पोटे, सामाजिक कार्यकर्ते के. के. कांबळे, संत रविदास प्रवचनकार अमोल वाघमारे, युवा मित्र पुणे अनिल गायकवाड, न्यायदंडाधिक ारी दशरथ बनसोडे, गटई कामगार विष्णु सातपुते, पोलिस कमिशनर माधव जमदाडे, उद्योजक बळीराम कांबळे, फतेचंद महाविद्यालय प्राचार्य घनशाम कांबळे, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ नखाते, पत्रकार विजयकुमार सोनवणे, उद्योजक संजय महाले, महिला अध्यक्ष सविता सोनवणे, क्लास 2 अधिकारी विशाल सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास शिवणेकर, धर्मिक क्षेत्रासाठी रमेश आदमाने यांचा सत्कार करण्यात येणार आहे.