रोह्यात ऑनलाईन फसवणुकीचा आणखी एक प्रकार

0

रोहा : रोहे तालुक्यासहीत संपूर्ण रायगड जिल्ह्यात सायबर क्राईमने अक्षरशः थैमान घातले आहे. झटपट पैसा अथवा कमी पैशात किंमती चिजवस्तू मिळणार म्हणून अनोळखी भामट्या व्यक्तिंच्या आमिषाला बळी पडून फसवणुकीचे अनेक प्रकार घडले आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाकडून जनजागृती होत असताना रोह्यात अजून एकऑनलाईन फसवणुकीचा प्रकार घडला आहे. आपण ऑनलाईन बुक केलेली अलिशान ऑडी कार चेन्नई विमानतळावर उभी आहे. परंतू 1लाख 86हजार रू. कस्टम ड्युटी भरल्याशिवाय कस्टम अधिकारी गाडी सोडणार नाहीत असे सांगत अलिशान कार देण्याच्या बहाण्याने अनोळखी भामट्याने आपल्या खात्यात 1लाख 86हजार जमा करून बनवाबनवी करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रोह्यात घडला आहे. याबाबत रोहा पेालीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

40 लाखांच्या अमिशाला पडला बळी
अतुल सुजय पाटील ही व्यक्ती सध्या थायलंड येथे नोकरीनिमित्त राहत असून त्यांच्या मोबाईलवरून धरमपूर येथील विजय बहुगुणा नावाच्या अनोळखी व्यक्तिने संपर्क करून आपण क्युक्कर मार्फत ऑनलाईन बुक केलेली ऑडी कार चेन्नई विमानतळावर आली असल्याचे सांगितिले. 40 लाख रू. किंमतीची अलिशन गाडी केवळ 2 लाखात मिळणार या आमिषापोटी जावई अतुल अजय यांनी त्यांचे सासरे राजेंद्र रघुनाथ मोकल यांनी विजय बहुगुना यांचे खात्यात दि.19 जुलै रोजी रक्कम ट्रान्सफर केली. मात्र गाडी आपल्या घरी का येत नाही? याविषयी अधिक चौकशी केली असता अज्ञात भामट्याने आपल्याला लाखो रूपयांना फसविले आहे याविषयाची खात्री होताच आपल्या जावयाची फसवणूक केल्यामुळे सासरे राजेंद्र मोकल यांनी रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.