रौप्यपदक सिंधू होणार राजपत्रित अधिकारी

0

चेन्नई । रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आता लवकरच नव्या भूमिकेत कार्यरत असलेली पाहायला मिळणार आहे. भारताच्या या आघाडीच्या महिला बॅडमिंटनपटूला तामीळनाडू सरकारने महसूल विभागातील क्लास वन अधिकार्‍याची नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला आंध्र प्रदेश लोकसेवा आयोगाने हिरवा झेंडा दाखवला आहे. सिंधूला राजपत्रित अधिकार्‍याची नोकरी देता यावी म्हणून गेल्या महिन्यात तामीळनाडूच्या विधिमंडळाच्या बैठकीत आंध्र प्रदेश लोकसेवा आयोगाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला होता.

राजपत्रित अधिकार्‍याची नेमणुक आंध्र प्रदेश लोकसेवा आयोग किंवा सेवायोजन कार्यालयामार्फत होत असते. त्यामुळे सरकारला आंध्र प्रदेश लोकसेवा आयोगाच्या 1994 च्या कलमात दुरुस्ती करावी लागली.

रोख पारितोषिकांचा वर्षाव
रिओमध्ये रौप्यपदक जिंकल्यावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सिंधूची राज्याची क्रीडादूत म्हणून नेमणूक करण्याबरोबर तीन कोटी रुपयांचा रोख पुरस्कार, अमरावती येथे निवासी जमीन आणि अ दर्जाच्या अधिकारपदाची नोकरी देण्याची घोषणा तामीळनाडूच्या विधिमंडळात केली होती. सिंधूचा जन्म हैद्राबाद येथे झाला आहे. त्यामुळे तेलंगणा सरकारने तिला सरकारी नोकरी, पाच कोटींचा पुरस्कार आणि जमीन देण्याची घोषणा केली होती. सिंधूने नोकरीसंदर्भातला प्रस्ताव नाकारून आंध्र प्रदेशमध्ये नोकरी करण्याची तयारी दाखवली.