जळगाव । येथील शारदा वेद पाठशाळा या संस्थेने नुकतेच रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले त्यानिमित्त मासिक ब्राह्मण डॉट कॉम च्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ‘शारदाश्रम’ या विशेषांकाचे गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा बँक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सतिष मदाने, शारदा वेद पाठशाळेचे प्रमुख आचार्य वे.शा.सं.अशोक साखरे गुरूजी, संस्थापक चंद्रकांत वैद्य, शु.य.ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष अजय डोहोळे व ब्राह्मण डॉट कॉमच्या कार्यकारी संपादिका अनघा डोहोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यांचे आहेत संदर्भ….
या स्मरणिकेत अशोक साखरे गुरूजी, प्रा.शरदचंद्र छापेकर, ब्राह्मण महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक जोशी, जेष्ठ पत्रकार विजय पाठक, वेदमुर्ती शाम शास्त्री पाठक, पुरोहित मंडळाचे अध्यक्ष ऋषीकेश जोशी, ज्योतिषाचार्य हेमंत कुळकर्णी, माजी विद्यार्थी गोटू गोरवाडकर, घनश्याम धर्माधिकारी, राजाभाऊ याज्ञिक या मान्यवरांच्या लेखासह जुन्या छायाचित्रांचा समावेश आहे. पाठशाळेच्या 1993 ते 2016 मधील काही विद्यार्थ्यांची यादी व अंतेष्टी करणार्या ब्रह्मवृंदांची नाव व फोन नं.यादीसह प्रकाशित करण्यात आले आहेत. पाठशाळेला भेट देणार्या मान्यवरांच्या उल्लेखांसह, देणगीदारांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. मुखपृष्ठावर शारदा मंदिरासह शारदा देवीच्या मूर्तीच छायाचित्र आणि पाठशाळेच्या उपक्रमांचे छायाचित्रे रंगीत स्वरूपात प्रकाशित करण्यात आले आहे. यावेळी सतिश मदाने यांनी साखरे गुरूजी व चंद्रकांत वैद्य यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.