मुंबई । र्हिदमिक जिम्नॅस्टिक्स विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळाडू म्हणून पूजा व मानसी सुर्वे या बहिणीनी आपला ठसा उमटविला आहे.यानंतर या दोन्ही भारतीय बहिणीनी आपल्या खेळाच्या सर्वोच्च कॅटेगरी (कॅटेगरी 3 वैयक्तिक आणि सांघिक) तर तिची बहीण मानसीने कॅटेगरी 4 (वैयक्तिक आणि सांघिक) प्रकारात जजची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.यामुळे एकाचवेळी दोन्ही बहिणीना आंतररराष्ट्रीय जज होण्याची संधी मिळाली आहे.
जज होण्यासाठी 15 ते 21 मे या कालावधीत मलेशियात परिक्षा झाली होती. त्यात रशिया, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, फिलिपिन्स अशा विविध देशांमधून 45 खेळाडू सहभागी झाले होते.पूजाने 2010 ला नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत र्हिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. जागतिक क्रमवारीत 16वे स्थान मिळविले होते. मानसीने राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टिक्स व राष्ट्रीय र्हिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.पूजा आणि मानसी या 2017 ते 2020 या कालावधीसाठी जज असतील.