लंडन । चॅम्पियन ट्रॉफीच्या ‘बी’ ग्रुप दक्षिण आफ्रिका व श्रीलंकेचा सामना होता. नाणेफेक जिकुन श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी पाचारण केले. दक्षिण आफ्रिके संघाचे सलामीवीर हाशिम आमला व क्विटंन डि कॉक हि जोडी मौदानावर आली.मात्र लंकेच्या गोलंदाजानी दोन्ही फलंदाजांना चांगले बांधून ठेवले होते. 12 षटकात अवघ्या 44 धावा झाल्या होत्या. 13 षटकाच्या पहिल्या चेंडूवर कॉक वैयक्तिक 23 धावावर प्रदिप याने झेल बाद केले.यानंतर तिसर्या क्रमांकावर आलेल्या फिल ड्यु प्लेसिस याने आमला बरोबर भागीदारी करित संघाची धावसंख्या 189 वर नेऊन ठेवली.फेसिस बाद झाल्यानंतर एबी डिव्हीलियर्स अवघ्या 4 धावा करून तंबूत परतला.डेव्हिड मिलर याने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला असता तो ही 18 धावांवर बाद झाला.ड्युमिनेने धुव्वाधार फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला.श्रीलंकेने 50 षटकात 6 गडी गमवून 299 धावांचे लक्ष्य श्रीलंकेसमोर दिले आहे. या सामन्यात हाशिम आमला याने 103 धावा केल्या त्यात 5 चौकार व 2 षटकार मारले.श्रीलंकेचे गोलंदाज लसिथ मलिंगा,असेला गुणरत्ने, या दोन्ही गोलंदाजाना एकही विकेट मिळाली नाही,नुवान प्रदीप याने दोन गडी बाद केले.सुरंगा लकमल,केसुगे प्रसन्ना,यांनी प्रत्येकी प्रत्येकी एक विकेट काढली.
कर्णधार व्हिलियर्स अपयशी
प्लेसिस बाद झाल्यानंतर कर्णधार एबी डी’व्हिलियर्स फलंदाजीसाठी मैदानावर आला.तो ही आपल्या नावाप्रमाणे संघासाठी कामगिरी करू शकला नाही. तो अवघ्या 4 धावांवर खेळत असतांना प्रसन्ना याच्या चेंडूवर झेल बाद करून दक्षिण आफ्रिकेला सर्वात मोठा धक्का दिला.कर्णधार बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर हा आमलाला साथ देण्यासाठी मैदानावर फलंदाजीसाठी आला.
आमला, प्लेसिसची भागेदारी
चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्या लढतीपुर्वीच श्रीलंकेचा कर्णधार अॅजेला मॅथ्यूच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे या सामन्याला मुकावे लागल्याने उपुल थरंगाच्या नेतृत्वाखाली संघाला नवीन संजीवनी मिळते का ? यावर क्रिकेट विश्वाचे लक्ष असणार आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंकेपेक्षा सरस आहे. त्यामुळे दिशाहीन श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेचे आव्हान पेलवणार का? हा मोठा प्रश्न असेल.श्रीलंकेने नाणेफेक जिकून त्यांनी फलंदाजीला दक्षिण अफ्रिकेला पाचारण केले. दणिक्ष आफ्रिकेच्या स्टार फलंदजा हाशिम आमला सुरवातीलपासून गोलंदाजाचा समाचार घेण्याचा प्रयत्न करतांना दिसला.त्याच्या जोडीला क्विंटन डी’कॉक संयमाने खेळत होता.मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी फलंदाजाना बांधून ठेवले होते.आफ्रिकेच्या 12 षटकात अवघ्या 44 धावा झाल्या होत्या. प्रदिप याच्या चेडू खेळतांना क्विंटन डी’कॉक हा वैयक्तिक 23 धावांवर झेलबाद झाला. तो दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका बसला. फॅफ डयू प्लेसिस हा फलंदाजीला आला असता आमला बरोबर चांगली भागीदारी केली.त्यालाही प्रदिपने 75 धावांवर तंबूत परत पाठिवले. त्यावेळेस संघाची धावसंख्या 189 वर 2 फलंदाज बाद झाले होते.
आमला 103 धावांवर बाद
संघाच्या धावसंख्येत 32 धावांची भागीदारी केली.वैयक्तिक 18 धावांवर खेळत असतांना लेकमलच्या चेंडूवर झेल बाद झाला.मिलर बाद झाल्यानंतर जेपी डयुमिनी खेळण्यासाठी मैदानावर आला असता धावा चोरतांना हाशिम आमला 103 धावांवर धावाबाद झाला.यानंतर ख्रिस मॉरिस खेळण्यास आला असता तो ही वैयक्तिक 20 धावांवर धावबाद झाला. वेन पार्नेल याने संघाच्या धाव संख्येत 7 धावांची भर टाकली तो नाबाद राहिला तर जेपी ड्युमिनी ही 38 धावावर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून हाशिम आमला याने शतक तर प्लेसिस याने अर्धशतक लावले.