भुसावळ- चातक निसर्ग संवर्धन संस्था व वरणगाव मेडीकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने यावल वन्यजीव अभयारण्यातील जामन्या वनपररक्षेत्रात लगंडा आंबा येथे आदिवासींसाठी एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात 100 हून अधिक आदिवासींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये वृद्ध, लहान मुले व शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. शिबिरादरम्यान खरुज या आजाराचे प्रमाण जास्त आढळून आले.
आदिवासींना कपड्यांसह औषधांचे वाटप
आदिवासी भागात आरोग्याविषयी अज्ञान व अनास्था मोठ्या प्रमाणात दिसून आले. त्यासाठी अशा दुर्गम भागात आरोग्य विषयक उपक्रमांची सात्यत्याने आवश्यकता असल्याचे वैद्यकीय पथकाला जाणवले तसेच शिबिरादरम्यान आदिवासींना कपडेही वाटप करण्यात आले व जंगलाच्या संवधर्ना विषयी प्रबोधन करण्यात आले. शिबिरासाठी नाशिक वन्यजिव विभागाचे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, वनक्षेत्रपाल अक्षय म्हेत्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच वरणगाव मेडिकल असोसिएशनचे डॉ.राहुल भोईटे, डॉ.रवींद्र माळी, डॉ.सुनील अहिरराव, डॉ.अनंत फेगडे व प्रशांत चौधरी यांनी आदीवासी बांधवांची आरोग्य तपासणी केली. यावेळी चातक निसर्ग सवंर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, सदस्य पियुष महाजन यांची उपस्थिती होती.